पुणे – लोहगाव (पुणे) येथील महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी चांदसाहेब खान (वय-६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (ता.२४) निधन झाले आहे. #MaharastraPolice
राज्याच्या पोलीस दलात महंमदरफी खान यांनी औरंगाबाद, पुणे आदि शहरात पोलीस निरीक्षक म्हणून ३६ वर्षे सेवा केली आहे. महंमदरफी खान यांना मागील चार दिवसांपूर्वी फातिमानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची शुक्रवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार आहे. #family
दरम्यान, पोलिसांना हक्काची घरे मिळावीत म्हणून त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुणे लोहगाव येथील सुमारे ८०० कोटीं रुपयांचा महाराष्ट्र पोलीस मेगासीटी प्रकल्प तयार केला. त्यांनी पोलीस, गृह आणि न्यायालयीन विभागातील आजी माजी कर्मचाऱ्यांसाठी आग्रहाने स्थापित केला होता. तसेच महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे प्रथम सचिव म्हणूनही त्यांनी कामकाज पहिले आहे. #Megacity #police #Khan #PunePolice #punepolice