Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकेरीवाडी ग्रामपंचायतीत 4 मार्चपासून प्रशासकराज! महादेव भंडलकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक

संदीप टूलेby संदीप टूले
Sunday, 3 March 2024, 17:20
Mahadev Bhandalkar appointed as administrator of ekeri grampanchyat

केडगाव: जानेवारी ते मार्च या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कालावधीत मुदत संपणार्‍या दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची  चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहे. यामध्ये एकेरीवाडी ग्रामपंचायतच्या लोक प्रतिनिधींचा कार्यकाळ रविवार 3 मार्च 2024 रोजी संपला असून 4 मार्च पासून राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या एकेरीवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासकीयराज असणार आहे.

दौंड तालुक्यातील मागील सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या पहिल्या टप्प्यातील एकूण 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या होत्या. डिसेंबर 2023 पासून दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या जातात. मात्र, अद्याप या ग्रामपंचायतींचे प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेला जवळपास महिना-दीड महिना लागणार आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नेमणूका केल्या आहेत.
यामध्ये एकेरीवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीचे अधिकारी महादेव भंडलकर यांची नियुक्ती झाली आहे, तर सचिव म्हणून एकेरीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नीलकंठ गायकवाड हे काम पाहत आहे.

गावात निवडणूक हाच चर्चेचा विषय

एकेरीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक कधी लागते अन कधी नाही अशी स्थिती सत्ताधारी, विरोधकांबरोबर गावातील मतदारांची  झाली आहे. निवडणूक केव्हा लागणार याची अद्याप तरी स्थानिक पुढार्‍यांना कल्पना नाही. मात्र, तरीही बैठका जोर धरू लागल्या आहे. काहींना तर ‘उमेदवारी तुम्हालाच, कामाला लागा’ असे आश्वासन देखील देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण जोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागत नाही, तोपर्यंत तरी गावात ग्रामपंचायत निवडणूक चर्चेचा विषय राहणार आहे.

 
संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post
Ranjangaon

चारचाकी वाहनांच्या चालकास मारहाण करत जबरदस्तीने वाहने चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची कामगिरी 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp