पुणे : खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती मधुकर पाटणकर याचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. संगीत शिक्षिका म्हणून काम केलेल्या मधुवंती मधुकर पाटणकर यांनी वयाच्या 87 वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोथरूड मधील जुन्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मधुकर पाटणकर यांच्या त्या पत्नी होत्या.
तसेच खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.