पुणे : पेरणे (ता. हवेली) येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरूपात २७ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
डॉ. दिवसे म्हणाले की, विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये, यासाठी लोणीकंद, पेरणे, वढू खुर्द हद्दीतील काही मोकळ्या जागांमध्ये येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. तसेच, पीएमपी बसेस थांबण्यासाठी तात्पुरते बस थांबे उभारण्यात येतात. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागा अधिग्रहित करणे आवश्यक आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लोणीकंद येथील गट क्र. ७५२, ७६०, ७५४, ७६३, ७६२, ७५३, ७५६, ७५७, १७, १८, १९, २१, २८-२, १०, १, ३०९, १२५, १२९, १३०, १३१, १३२, १९४, १९७, १९८, १८३ तसेच वढ् खुर्द गावातील गट क्र. ११८/१, ११९, १२१, १२२, १२३, १२८, १७३, १७४/१ तर फुलगाव येथील गट क्र. २००/१ व आणि पेरणे येथील ९३३/२ अ, ९३४/२, १२२६ या गट क्रमांकातील मोकळ्या जागा अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता अधिग्रहित करण्यात येणार आहेत.
पीएमपीएमएल पार्किंगसाठी लोणीकंद येथील गट क्र. २, ३, ४/१, ४/२, तर बुकस्टॉलकरिता पेरणे येथील गट क्र. ९६३/१, ९५०, ९४४, ९६७ या मोकळया जागा अधिग्रहित करण्यात येणार आहेत. याशिवाय पेरणे येथील गट क्र. ४८९ ही सरकारी गायरानाची जागा अतिरिक्त जमीन असेल. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेरणे येथील गट क्र. १०४०, १०४२ मधील जागा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करण्यात येणार आहे. अनुयायांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग, जीत ढाब्यासमोर, पुणे नगर हायवेवर, शिक्रापूर, तोरणा पार्किंग बजरंगवाडी, शिक्रापूर, टोरांटो गॅस, खालसा पंजाबी ढाबा, चौधरी ढाबा, जातेगाव खुर्द, शंभू महादेव तळेगाव ढमढेरे, कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी, कोरेगाव भीमा बाजारतळ, इनामदार पार्किंग कोरेगाव भीमा, क्रीशा होंडा शोरुम ड्रॉप पॉइंट कोरेगाव भीमा, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पॉईंट कोरेगाव भीमा, वढू बु, हॉटेल वहिनीसमोरील पार्किंग याप्रमाणे पार्किंग, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.