पुणे : Lonikand Crime पुणे शहारह उपनगर तसेच ग्रामीण भागात जमीनीची किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा फायदा घेत जमीन विक्रेते खरेदारांची फसवणूक केल्याच्या घटना घडत आहे. (Lonikand Crime) त्यात जमीन खरेदीखत करून ताबा देतो असे पाच जणांनी जमीनीचा ताबा ने देता तब्बल 22 लाख 11 हजार 600 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. (Lonikand Crime)
लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार खेडेकर, नितीन गोते, रोहित गोते, राहुल मोरबाळे, मिथुन हारगुडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा लोणीकंद पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबत दिपक शिवाजी खलसे (30, रा. कुसमाडे वस्ती, कळसगांव, विश्रांतवाडी, आळंदी रोड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. 3 ऑगस्ट 2022 पासून आजपर्यंत आरोपींनी आपआपसात संगणमत करून तक्रारदार दिपक खलसे यांच्यासह इतर व्यक्तींना जमीन खरेदीखत करून ताबा देतो असे सांगुन त्यांच्याकडून 22 लाख 11 हजार 600 रूपये घेतले. फिर्यादी खलसे आणि अन्य लोकांना त्यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा ताबा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांकडे फिर्याद आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.