लोणी काळभोर, (पुणे) : स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड पालखी सोहळ्याचे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांच्या गजरात व मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पिता-पुत्राची भेट छञपती शिवाजी महाराजांच्या अंतिम समयी झाली नव्हती, त्यामुळे या पालखीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घडवून आणली जाते.
शिवचरित्र व शंभूचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पालखीचे हे ५ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (ता. ०५) शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आले.
यावेळी पहिला मुक्काम हा खेड येथे करण्यात आला. दुसरा मुक्काम राजगुरूनगर येथे झाला. तिसरा मुक्काम हा धर्मविर संभाजी महाराज समाधीस्थळ वढु बु. या ठिकाणी होता. पालखीचा चौथा मुक्काम शनिवारी (ता. ०७) थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी मंदिर येथे झाला.
रविवारी (ता. ०८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्याचा उद्देश छत्रपती श्रीशिवाजी महाराज धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची अखेरच्या क्षणी राहून गेलेली भेट पुन:श्च घडवुन आणने हा आहे. व या उद्देशाने बरोबर आपली धर्म संस्कृती परंपरा धार्मिक सौदार्ह जपण्याची समाजात जागृतीकरणे हा आहे.
दरम्यान, छत्रपती शिव शंभुचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. या पालखी सोहळ्यातील मार्गावरील गावात व्याख्याणे प्रवचणे व ईतिहासाचा जागर होतो आहे. असे स्वराज्य संघाचे अध्यक्ष ह.भ.प श्रीभानुदास महाराज बांगर यांनी सांगितले.
या वेळी स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दोघे, सचिन शामकांत निघोट, जिल्हाध्यक्ष माऊली कुंजीर, संघटक सचिन रोहन सपकाळ, राष्ट्रीय हॉकी खेळाडु सतिष दत्तात्रय काळभोर, भाजपा नेते संदेश काळभोर, कदमवाकवस्तीच्या ग्रामपंचायत सदस्या रूपाली काळभोर, उद्योजक चेतन काळभोर, सतीश काळभोर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ संचालक बाळासाहेब सपकाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे, दत्तात्रय काळभोर, शब्बीर पठाण, आदि उपस्थित होते.