लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तब्बल १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांचा जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. तर यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रशालेच्या शाळेतील १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक प्रवीण भवाळ, पृथ्वीराज काळे, सोमनाथ शेंडकर, बेबी जगदाळे, वैशाली म्हेत्रे निलोफर शेख यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे लोणी काळभोरचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही ३०० गुणांची असते. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास असतो. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
यशस्वी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक
शिष्यवृत्ती परीक्षेत लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा क्र १, शाळा क्र. २ मधील १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर माळवाडी कवडी व सिद्राम येथील प्रत्येकी १ असे एकूण १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. हे यश मिळवून विद्यार्थिनींनी लोणी काळभोर गावाच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे लोणी काळभोरसह जिल्ह्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
उत्तीर्ण विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे :
१) लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा क्र १ : प्रतिक मेघराज यादव, प्रथमेश भास्कर कोल्हटकर, शिवम दिपक कातोरे, सोहम दिनेश शिंदे, सुमित सदाशिव चाकुरे, आदर्श दत्ता रणधरे, साकिब अल्लाउद्दीन शेख, रुद्र सोमनाथ राजुरे, स्वराज शशिकांत कागले, वंश रघुनाथ शिंदे
२) शाळा क्र- २: श्रुती किशोर चौरे, दिव्या व्यंकटेश राठोड, आफ्रीन उमर चौधरी, वैष्णवी लक्ष्मण मोटे, गौरी गणेश खेडकर
३) माळवाडी कवडी : प्रथमेश रविंद्र गायके
४) सिद्राममळा : विराज राहूल बनसोडे