Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : चार वेळेस यश मिळवूनही गुणवत्ता यादीत नंबर आला नाही. मात्र हताश व निराश न होता अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जावू नये, पुन्हा प्रयत्न करीत राहावे.
विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जावू नये ; किरण पोपळघट…
परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाला मेहनत व अभ्यासाची जोड दिल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते असल्याचे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या किरण पोपळघट यांनी सांगितले.
लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये रविवारी (ता. १९) प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संलग्न हवेली तालुक्याच्या पत्रकार संघाची बैठक तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एमपीएससीकडून २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल नुकताच जाहीर झाला. पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी पोपळघट बोलत होते.
मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, राज्य खजिनदार विजय काळभोर, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुडे, सचिन सुंबे, अमोल अडागळे, जयदीप जाधव, अमोल भोसले सचिन माथेफोड, हनुमंत चिकणे, शहाजी नगरे, विशाल कदम, श्रीनिवास पाटील, भाऊसाहेब महाडिक, रियाज शेख, प्रसाद देडे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, एच3 एन2 ( H3N2)या इन्फुल्युएन्झा विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याबाबत घ्यावयाची काळजी, विषाणू आजारांची लक्षणे, त्यावरील उपचार याबाबत विश्वराज हाॅस्पिटलचे डॉ. छगन खारतुडे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेची ध्येय, धोरणे, भविष्यातील वाटचाल या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष सचिन सुंबे यांची दैनिक लोकमतच्या वार्ताहरपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी नगरे यांनी केले. आभार अमोल भोसले यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Suicide News | मेडिकल चालक तरुणाची केडगाव रेल्वेलाईनवर ‘आत्महत्या
Pune Accident | चांदणी चौक परिसरात खाजगी बस १५ फूट खाली कोसळली; बसमध्ये 35 प्रवासी
Pune Crime | पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ; गोखलेनगर भागातील चंदनाची ३ झाडे चोरली