उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालय व बसस्थानक परिसरात कॉलेजमधील युवक व बाहेरील युवकांचा विनाकारण वावर असतो, अशा मोटारसायकलवरून फिरणाऱ्या युवकांना लोणी काळभोर पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे.
बारावीच्या परीक्षा सुरु असून महात्मा गांधी महाविद्यालाच्या बाहेर ट्रिपल सीट फिरणे, चौकात थांबून राहणारे, विनाकारण मोटारसायकल फिरवणारे, कर्कश हॉर्न वाजवणे, आरडाओरडा करणे, असे करणाऱ्या युवकांना प्रतिबंधक घालण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांच्या पथकाने उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत कारवाई सुरु केली आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या बाहेर गराडा घालून व जमाव जमवून तसेच गाडीवर विनाकारण फिरणाऱ्या युवकांना पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांनी योग्य त्या सुचना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
यापुढे अशा कोणतीही तक्रारी आल्यास किंवा आढळून अल्यास संबंधित तरुणांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असून असे करणाऱ्या युवकांच्या हालचालींवर पोलिस नजर ठेवून असल्याचे किरण धायगुडे यांनी यावेळी सांगितले.