Loni Kalbhor : लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्व शहरे, ग्रामीण भागातील रस्ते स्वच्छ करून सर्वांसाठी मूलभूत स्वच्छतेची सोय सुनिश्चित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रविवारी (ता. १ ऑक्टोबर) ‘एक तारीख- एक तास’हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी योजनेला प्रतिसाद देत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन’ व ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली.
श्रमदानातून संपूर्ण गाव स्वच्छ
‘एक तारीख-एक तास’ या उपक्रमामध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून शालेय परिसराची स्वच्छता केली. तर विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ भारत, जीवनातील स्वच्छतेचे महत्व, स्वच्छ परिसर, माझे गाव स्वच्छ गाव… अशा विविध विषयांवर निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (Loni Kalbhor) या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. (Loni Kalbhor) यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३”च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत आहे. तर देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम रविवारी (ता. १) राबविण्यात आली.
या वेळी लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, लोणी काळभोर शिक्षण केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या पर्यवेक्षका रेखा पाटील, विलास शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस प्रशासन, कन्या प्रशाला, (Loni Kalbhor) जिल्हा परिषद शाळा या सर्वांनी एकत्र येऊन “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून संपूर्ण गाव स्वच्छ केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : निरोगी हृदय राखणे ही सामायिक बांधिलकी : डॉ. सूरज इंगोले
Loni Kalbhor : दुचाकीचा कट मारल्याचा विचारला जाब; तरुणावर कोयत्याने सपापसप वार