Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ८३.६६ टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली. (Loni Kalbhor: Omkar Bhagwat stands first in Prithviraj Kapoor Memorial High School in class 10th examination; 83.66 percent result of the school..)
१६९ विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Loni Kalbhor News) विद्यालयातील २०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १६९ विद्यार्थी पास झाले आहेत.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी ओंकार नवनाथ भागवत ९३.२० टक्के, द्वितीय सुरज अशोक चोरमले, ८८.२० टक्के, तृतीय रोहन तानाजी वरपे ८६. २० टक्के, चतुर्थ किरण कृष्णा बोराडे ८६.२० टक्के, व आकाश शरद वाघमारे ८४.८० टक्के, गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. (Loni Kalbhor News)
दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षक शरद शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे विश्वस्त व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले (Loni Kalbhor News) व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे महेश नवमीच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!