लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी निघालेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा येथे गुरुवारी (ता.20) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांना 2 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
मुबारक जाफर गड्डे (वय – 43, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कर्डिले हे नेहमीप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावरून अवैध हातभट्टी दारूची चारचाकी गाडीतून वाहतूक होणार आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सापळा रचला. तेव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पकडली पकडली. त्या गाडीमध्ये हातभट्टी गावठी दारु भरलेली एकूण 8 कॅन्ड, एकुण 280 लीटर दारु मिळून आली आहे.
त्यानंतर पोलिसांनी गाडीसह सुमारे 2 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी मुबारक गड्डे याला अटक करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमन कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, प्रदीप गाडे, पोलिस अंमलदार राहुल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.