Loni Kalbhor News : लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी व्यवसायाचे मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (ता.२६) करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन नवपरिवर्तन फाउंडेशनने केले आहे. हा कार्यक्रम कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील मधुबन कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत पार पडणार आहेत.
उद्योजक महिलांना आपला व्यवसाय स्टॉलच्या माध्यमातून अधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य स्टॉल प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी खास मंगळागौरी ग्रुप कार्यक्रम तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा यामध्ये मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मेकअप हेअर स्टाइल स्पर्धा, महाराष्ट्रीययन वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा अशा स्पर्धांचे तसेच कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (Loni Kalbhor News)
दरम्यान, विविध स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक सुवर्णसंधीच गौरी गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.
महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत : गौरी गायकवाड
माजी सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या की, ‘जगभरात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. पण तरीही भारताचा विचार केला तर आजही लाखो महिला केवळ गृहिणी म्हणून जगत आहेत. वाढत्या महागाईमुळे घर खर्च चालविण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते. मात्र, अनेक महिला घरातील जबाबदारीमुळे घराबाहेर पडून नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत. अशा सर्व महिलांसाठी वाढदिवसानिमित्त व्यवसायाचे मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे’. (Loni Kalbhor News)