लोणी काळभोर : लहानपनापासुचन आई वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन थेऊरसह पुणे जिल्ह्यात निरपेक्षपणे काम करून आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटविला आहे. रुग्णांना वैद्यकीय मदत किंवा मंदिरांना आर्थिक निधी असो कोणत्या मंत्र्याकडून कसा व किती निधी आणायचा? हे आरोग्यदूत युवराज काकडे यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे पुढील येणाऱ्या काळातही भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहर), महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील आरोग्यदूत व ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 कोटी 35 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (ता. 23) करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री कदम बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, माजी सरपंच सचिन तुपे, कावेरी कुंजीर, छाया काकडे, दिलीप वाल्हेकर, शामल पवार, राम राऊत, शोभा चौधरी, हिरामण काकडे व हवेली तालुक्यातील अनेक राजकीय नेते, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मंत्री आहेत. मुख्यमंत्री असतानाही विकासासाठी मोठी कामे केली असून उपमुख्यमंत्री असतानासाठी विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत आहेत. कोणाचीही नावे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून कट होणार नाहीत. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, युवराज काकडे हे राष्ट्रवादीचा असताना देखील शिवसेनेशी असलेली मैत्री चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, युवराज नानांनी थेऊर गावाच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे या निधीमुळे गावाचा विकासाच्या दृष्टीने कायापालट होणार आहे. तसेच स्वतः थेऊरसह परिसरात निधी देऊन विकासाची गंगा वाहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2700 मताधिक्य देऊन मला निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो.
युवराज काकडे म्हणाले की, अष्टविनायक गणपतीला जाणारा सर्व मार्गांना निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील बऱ्याच मंदिरांना विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून दिला आहे. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्या वाढदिवसासाठी व विविध विकासकामांसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो.
1200 नागरिकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ
महाआरोग्य शिबिरामध्ये 1200 नागरिकांनी सहभागी झाली होती. यामध्ये नागरिकांची हृदयरोग तपासणी, किडनी तपासणी, डोळ्यांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, कान-नाक-घसा, हाडांची तपासणी, दातांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. रक्तदान करणाऱ्या 102 रक्तदात्यास मोफत 10 लाखाचा अपघाती विमा देण्यात आला. 700 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांकरिता मोफत मॉड्युलर हात-पाय व कॅलिपर्स अपंग, अँप्युटीज, पोलिओग्रस्त आणि गँगरीन ग्रस्त, डायबेटीक फुट लोकांसाठी देण्यात आले.