विशाल कदम
loni Kalbhor | लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या करण राहुल चिले या विद्यार्थ्याचे चेन्नई येथील ”नोशन प्रेस” (Notion Press) यांनी ”द बडगी बर्ड” (Baudgi Bird) हे पुस्तक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
करण चिले या मुलाला लहानपनापासून पक्षी आवडत होते. पक्षांना खाऊ घालते की, ते पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घेऊन जातात ते पाहताना आनंद वाटत होता. पक्षांवर असलेले प्रेम पाहून करण चिले याने पक्षी पाळण्याचे ठरविले. आणि करणने १० वर्षापूर्वी पुण्यातून दोन बडगी बर्ड पक्षाची जोडी आणल्या. आणि करण हा स्वत: त्या पक्षांची देखभाल करीत असे.
गेल्या १० वर्षात बडगी बर्ड या पक्षाच्या जीवनचक्राचा अभ्यास….
करण चिले याने गेल्या १० वर्षात बडगी बर्ड या पक्षाच्या जीवनचक्राचा अभ्यास केला. आणि या पक्षाचे ”द बडगी बर्ड” हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक चेन्नई येथील ”नोशन प्रेस” ने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला पक्षीप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
करण चिले याने ”द बडगी बर्ड” या लिहिलेल्या पुस्तकात बडगी बर्ड या पक्षाच्या जीवनक्रमनाच्या संदर्भात सविस्तर माहिती लिहिली आहे. बडगी बर्ड या पक्षामधील नर-मादी कशी ओळखणे, पक्षांना राळे, मका, भात व फळे यांसारखे अन्नपदार्थ आहार म्हणून खाण्यासाठी देणे. पक्षांची काळजी कशी घ्यायची. पक्षांची पचनसंस्था व्यवस्थित राहण्यासाठी लिव्हर tonic व कॅल्शियम यासारखी औषध पाजायची. अशी महत्वाची माहिती चिले याने या पुस्तकात लिहिली आहे.
दरम्यान, करण चिले या अवघ्या १६ वर्षाच्या मुलाचे ”द बडगी बर्ड” हे पुस्तक प्रसिध्द झाल्यामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लोणी काळभोर व परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून करण चिलेचे भरभरून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना करण चिले म्हणाला की, बडगेरिगर, ज्याला बडगी किंवा पॅराकीट देखील म्हणतात, हा एक लहान, चमकदार रंगाचा पक्षी आहे. जो मूळचा ऑस्ट्रेलियाचा आहे. हे पक्षी जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर ठेवलेले पाळीव पक्षी आहेत. आणि त्यांच्या खेळकर आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loniknad Accident News : अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी
Lonikand News : लोणीकंद मधील भंगार दुकानदाराला लुटणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई