Loni Kalbhor | लोणी काळभोर : शेती, शेतकरी, सर्वसामान्य माणूस, प्राणी सर्वांसाठी पाणी अत्यावश्यक असून आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये. म्हणून योग्य ते प्रतिबंधक उपाय योजण्याची गरज आहे. असे मत हवेलीचे वनपरिक्षेत्र आधिकारी मुकेश सणस यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोंडे वस्ती, मांडाळा येथील साने गुरुजी बंधा-याच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन मुकेश सणस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वनपरिमंडल आधिकारी मंगेश सपकाळे, वनरक्षक ए जी कचरे, वन हक्क समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, राजाराम काळभोर, भारती काळभोर, संगीता काळभोर, सविता लांडगे, राजेंद्र काळभोर, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, अमित काळभोर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना मुकेश सणस पुढे म्हणाले ,गेल्या काही वर्षात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात वृक्षारोपणावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. याकामी वनविभागाचे ग्रामस्थांना संपूर्ण सहकार्य मिळेल. आपल्या पिढीने वृक्षारोपण नाही केले तर त्याचे दुष्परिण पुढील पिढ्यांना भोगावे लागतील. त्यामुळे वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.
साने गुरुजी बंधा-यावर तीन लाख रुपये खर्च त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. आतील गाळ काढून बंधा-यावर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बंधा-यात साठणा-या पाण्याचे प्रमाण वाढून परिसरातील शेती, नागरिक, प्राणी यांना जास्त पाणी मिळेल. गेल्या वर्षीच्या पावसात बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
त्यामुळे यंदाच्या पावसाळ्या अगोदर त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी वनहक्क समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर यांनी सहकार्याबद्दल वनविभागाचे व उपस्थितांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल