Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 April 2026, 18:53
Loni kalbhor

photo- social media

Loni kalbhor : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठलाग करत यशाचे शिखर गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मोनाली गोविंद जाधव. भाजी विक्री करणारे वडील आणि शेतमजुरी करणारी आई अशा साध्या कुटुंबातून आलेल्या मोनालीने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न साकार केले आहे.

राजगृह कॉलनीतील अवघ्या दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत मोनालीचे कुटुंब वास्तव्यास आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. वडील गोविंद जाधव दिवस-रात्र कष्ट करून भाजी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रेखा जाधव शेतात मजुरी करून संसाराला हातभार लावतात. अशा संघर्षमय वातावरणात वाढलेल्या मोनालीने लहानपणापासूनच ‘पोलीस व्हायचे’ हे स्वप्न मनाशी बाळगले होते.

मोनाली चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लोणी काळभोरमध्येच झाले. सध्या ती हडपसर येथील एस. एम. जोशी विद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. सुरुवातीला पोलीस भरती प्रक्रियेबद्दल तिला फारशी माहिती नव्हती. मात्र महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींच्या मार्गदर्शनातून तिने या क्षेत्राची माहिती घेतली आणि त्यासाठी ठामपणे तयारी सुरू केली. आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानंतर मोनालीने प्रशिक्षणासाठी श्री अकॅडमीत प्रवेश घेतला. सकाळी लवकर उठून धावणे, व्यायाम, शारीरिक कसरती आणि दिवसभर अभ्यास असा तिचा कठोर दिनक्रम सुरू झाला.

 

घरची जबाबदारी सांभाळत आणि शिक्षण सुरू ठेवत तिने कोणतीही तडजोड न करता स्वतःला पूर्णपणे तयारीत झोकून दिले. या मेहनतीचे फळ तिला पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत मिळाले. शारीरिक क्षमता चाचणीत तिने 50 पैकी 47 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली, तर लेखी परीक्षेत 100 पैकी 79 गुण मिळवले. एकूण 126 गुणांसह खुल्या प्रवर्गातील 125 गुणांच्या मेरिटमध्ये स्थान मिळवत तिने पोलीस कॉन्स्टेबल पदावर आपली निवड निश्चित केली.
मुलगी पोलीस झाली, ही आनंदाची बातमी कळताच आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वर्षानुवर्षे कष्ट करून मुलीला उभे करण्याचे स्वप्न अखेर साकार झाल्याने त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले.

मोनाली जाधवची ही यशोगाथा केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या जिद्दीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती आणि मेहनत असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. मोनालीच्या यशामुळे कदमवाकवस्ती परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साध्या कुटुंबातून येऊन मोठे यश मिळवणाऱ्या मोनालीने अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा दिली आहे.

यावेळी बोलताना मोनाली म्हणाली, “माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे मोठे योगदान आहे. त्यांनी खूप कष्ट केले, त्याग केला. कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी सातत्याने मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. अपयश आले तरी हार मानू नका. प्रामाणिक प्रयत्न करत राहिलात, तर यश नक्की मिळते.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज - सभापती युवराज काकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.