Loni Kalbhor लोणी काळभोर, (पुणे) : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हे लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथील भाजीविक्रेत्याची मुलगी ऋतुजा रामदास कोतवाल हिने सिद्ध करून दाखविले आहे. ऋतुजाने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा Loni Kalbhor वर्षाव होत आहे.
लोणी स्टेशन येथील एका कार्यालयात भाजप सोशल मिडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्याहस्ते ऋतुजा कोतवाल यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी
सनदी लेखापाल पी. डी. वैष्णव, पुणे प्राईम न्यूजचे पत्रकार हनुमंत चिकणे, विशाल कदम, प्रिया बंडगर, फिजा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
आई-वडिलांना शेतात व भाजी विक्री करण्यास मदत…!
ऋतुजाचे वडील रामदास कोतवाल हे शेती करतात. तर आई सुजाता कोतवाल या लोणी स्टेशन परिसरात भाजीविक्री करतात. जेमतेम आर्थिक परिस्थितीत ऋतुजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अष्टापूर येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेतून पूर्ण केले. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने अभ्यासातील जिद्दीपणा परिस्थितीपुढे ऋतुजाने सोडला नाही. प्रापंचिक समस्या सोडविण्यातच शेतीतील उत्पन्न पुरत नसे. त्यामुळे आई-वडिलांना शेतात व भाजी विक्री करण्यासाठी ऋतुजा नेहमी मदत करीत असे.
घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून ऋतुजाने कष्टाने अभ्यास केला. आणि राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेल्या पालघर पोलीस भरतीच्या परीक्षेत ऋतुजा उत्तीर्ण झाली आहे. ऋतुजा पोलीस भरती झाल्याने कदमवाकवस्ती व अष्टापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, आपल्या गावाची शान वाढवली, आई- वडिलांनी घेतलेल्या अपार मेहनतीबद्दल त्यांचेही अभिनंदन नागरिक करीत आहेत.
दरम्यान, लोणी स्टेशन येथे भाजीविक्रेत्या महिलेच्या मुलीने मिळविलेल्या यशाबद्दल ऋतुजाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तसेच अपयशाने खचून न जाता अभ्यासाला परिश्रमाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते हे ऋतुजा कोतवाल हिने दाखवून दिले आहे. परिस्थिती नसताना ऋतुजाने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत बोलताना ऋतुजा म्हणाली की, आई-वडिलांनी कष्ट करून नेहमी मला पोलीस भरतीसाठी प्रेरणा दिली आहे. त्यांनी दिलेली प्रेरणाच या यशामागचे कारण आहे. तसेच हे यश मी आईवडिलांच्या चरणी अर्पण करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor News : लोणी काळभोरच्या सरपंचपदी योगेश काळभोर यांची बिनविरोध निवड..!