Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त घटस्थापना बुधवारी (ता. २९) होणार असून आगामी दहा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती) असते. यंदा हि यात्रा गुरुवारी (ता.०६) व शुक्रवारी (ता. ०७) एप्रिलला सुरु होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात आला. सायंकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त चैत्रनवरात्रातील घटस्थापना बुधवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.रविवारी (ता. ०२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुवासिनींनी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. ०४) सायंकाळी सात वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता. ०६) हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापुजा पहाटे चार वाजता होणार आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होईल.
शुक्रवारी (ता. ०७) पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा…
शुक्रवारी (ता. ०७) पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला आहे. येथील कुस्त्यांचा आखाडा कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. या आखाडय़ात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होतात. विजेत्यांना जवळपास पंचवीस लाख रुपये रोख बक्षीस म्हणून दिले जातात.
दरम्यान, शनिवारी (ता. ०८)रात्री दहा वाजता वरात काढण्यात येणार आहे. मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत मारुती मंदिराजवळ पहाटे ४ ते ६ या वेळेत जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ संत एकनाथांचे भराड (कथा) सादर होणार आहे. परिसरातील नागरिकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष योगेश काळभोर व ग्रामस्थांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Maharashtra Govt News | शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू