loni kalbhor : थेऊर काकडे मळा-नायगाव रस्त्यावर भरधाव चाललेल्या फॉर्च्यूनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची शुक्रवारी (ता. 6 ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चलकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय अनिल कुंजीर (वय 32), प्रणय राहुल कांबळे (वय 25) व शुभम पंडित थोरे (वय 25 , रा. कांबळे वस्ती, थेऊर) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी प्रणय राहुल कांबळे याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7771 नंबरच्या फॉर्च्यूनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय कांबळे व त्याचा मित्र शुभम हे दुचाकीवरून राहत्या घरी शुक्रवारी चालले होते. घरी जात असताना अक्षय कुंजीर हा रस्त्यात भेटला. त्यालाही दुचकीवर बसवून आम्ही चाललो होतो. तेव्हा पाठीमागून आलेल्या फॉरच्यून कंपनीच्या (क्रमांक 7771) गाडीने मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात प्रणय कांबळे हा रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडला. यावेळी जमलेल्या लोकापैकी ज्योतीराम जाधव याने उपचारासाठी तत्काल लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात प्रणय कांबळे याच्या डोक्याला मार लागला आहे तर मनका फॅक्चर झाला आहे.
दरम्यान, फॉर्च्यूनर चालकाने अपघाताच्या ठिकाणी कोणतीही मदत न करता पळून गेला आहे. या अपघातास, अपघातातील जखमीस व दुचकीच्या नुकसाणीस कारणीभूत ठरला आहे. अशी तक्रार प्रणय कांबळे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडी क्रमांक 7771 वरील अज्ञात चलकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (अ), 125 (ब), 324 (4), 119, 177, 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष बारगजे करत आहेत.







