Lonavla News : लोणावळा : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी मित्रांसोबत आलेला एक तरुण वाट चुकला होता. वाट शोधण्याच्या प्रयत्नात तो येथील एका धबधब्याजवळ घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षक संस्थेच्या आपत्कालीन पथकासह पाटण ग्रामस्थांनी या तरुणाला सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गडावरून सुखरूप खाली आणले. अर्जून पाटील (रा. मिरज, सांगली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वन्यजीव रक्षकांसह पाटण ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात
याबाबत शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन पाटील आणि त्याचे मित्र शैलेश गायकवाड, विक्रम जाधव आणि उतारेश्वर सुरवस हे चौघेजण रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मावळातील विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परत येत असताना अर्जुन चालत दुसरीकडे गेला. (Lonavla News) गडकिल्ला परिसरात वाट चुकून येथील एका धबधब्याजवळ निसटून पडल्यामुळे गंभीर झाला. यामध्ये त्याचा एक हात फॅक्चर झाला आणि हनुवटीला जोरात मार लागल्याने दात पडले. मित्रांना फोन करून त्याने सांगितल्यानंतर मित्रांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्याला शोधत पाटणपर्यंत आले.
लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला सायंकाळी ७ वाजता एक संदेश आला. स्थानिक लोक त्याला शोधून खाली गावात घेऊन येतील म्हणून शिवदुर्गच्या पथकाने काहीवेळ वाट पाहिली. परंतु रात्री साडेनऊच्या दरम्यान स्थानिक लोकांनी मदतीसाठी शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला येण्याचे आवाहन केले. (Lonavla News) परिस्थिती लक्षात घेऊन शिवदुर्गचे आपत्कालीन पथक व वन्यजीव रक्षक संस्थेचे शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य तत्काळ विसापूर किल्ल्याच्या दिशेने रवाना होत घटनास्थळी दाखल झाले.
आपत्कालीन पथकातील योगेश उंबरे, प्रणय अंभूरे, कुणाल कडू, रतन सिंग, आदित्य पिलाने, सिद्धेश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे, रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे यांच्यासह पाटणच्या काही ग्रामस्थांनी जखमी झालेल्या अर्जुनला स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचरवरून खाली आणले. पथकाने मोठ्या मेहनतीने स्ट्रेचरमधून रात्री साडेबाराच्या दरम्यान अर्जुनला खाली आणले आणि त्याला पुढील उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (Lonavla News) या मदतीमुळे अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी आपत्कालीन पथकासह पाटण ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अल्पवयीन मुलाला फरशीने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Pune News : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर