Lonavala Accident : लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना हा अपघात ३५ किमी जवळ झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चुराडा झाला असून, एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाले असून, दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (क्र. एम एच ४६ ए आर ०१८१) पुण्याकडून मुंबईकडे जात होता. किलोमीटर ३५ जवळ आल्यावर हा कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन उलटला. (Lonavala Accident ) या अपघातात पाच चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात कारमधील एक महिला आणि चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. पुढील उपचारासाठी जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेरनवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून पुणे लेनवर आडवा झाला. (Lonavala Accident ) त्याचवेळी पुणे लेनवरून जात असलेल्या स्विफ्ट कारला या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचा चक्काचूर झाला. या भयानक अपघातात कारचालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील ४ महिला गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर वाहतूक कोंडी
अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. (Lonavala Accident ) सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांत या महामार्गावर तब्बल सहा वेळा लेन बंद राहिली. त्यात मेगा ब्लॉक आणि अपघात ही कारणे आहेत. यामुळे या महामार्गावर कासवगतीने वाहतूक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
Lonavala News : लोणावळ्यानजिक घनदाट जंगलात हरविलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश
Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा