लोहगाव : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) तिस-या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर लोहगावातील 105 वर्षीय आजोबांनी पोस्टल मताचा (Postal Vote) अधिकार बजावला. या आजोबांचे नाव चिमन खांदवे (Chiman Khandve)(रा.खंडोबा माळ, लोहगाव) आहे.
वयामानानुसार ते आजोबा शारीरिकदृष्ट्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास सक्षम नव्हते. त्यांनी मुलगा तानाजी यांना आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा असल्याचे सांगितले.
आजोबांचा मुलगा तानाजी यांनी पोस्टल मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेऊन, एक महिना अगोदर रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज भरुन प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार आज निवडणूक अधिकारी यांनी खांदवे यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करुन घेतले.