Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting: लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज 7 मे रोजी पार पडत आहे. यावेळी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 जागांवर आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदान झालं आहे. यापैकी सर्वाधिक मतदान हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालं आहे. इथे 8.17 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी म्हणजेच 4.99 टक्के मतदान माढ्यात झालं आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी
– लातूर – 7.91
– सांगली – 5.81
– बारामती – 5.77
– हातकणंगले – 7.55
– कोल्हापूर – 8.04
– माढा – 4.99
– धाराशिव – 5.79
– रायगड – 6.84
– रत्नागिरी – 8.17
– सातारा – 7
– सोलापूर – 5.92