पुणे : आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तिस-या टप्प्यातील मतदान होत आहे. यावेळी सकाळपासून अनेक घडामोडी ऐकायला मिळाल्या. त्या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची (EVM machine) पूजा केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मतदान केंद्रावर रुपाली चाकणकर या EVM मशीनची आरती करताना दिसत आहेत. हा प्रकार पाहताच मतदान केंद्रावरील अधिकारी चक्रावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिका-यांनीच याप्रकरणी तक्रार दिली.
ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.