बारामती : आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यात आता एक सर्वात मोठा ट्विस्ट बारामतीच्या राजकारणात पाहायला मिळाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडी इथल्या घरी गेल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत, त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत सुरु आहे. सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं ट्विस्ट आहे. कारण या भेटीचा परिणाम नक्की काय असेल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील.
बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी अनेजण तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता त्या अजितदादांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतरच या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.
सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची भेटीची चर्चा आता सर्वत्र पसरली आहे. सु्प्रिया सुळेंच्या भेटीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र हे कुटुंब एकच आहे. पवार कुटुंबात कोणतेच वितुष्ट नाही, हे एकत्रच राहणार असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून या लढाईत सहभागी व्हायचे का? असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
आज सकाळी मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. आशा काकींना भेटण्यासाठी मी आले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तसेच त्यांचा आशिर्वाद घ्यायला आले होते.