शिक्रापूर : कारेगाव (ता. शिरूर) येथील यश ईन चौक परिसरातील गोवा वाईन्स समोर एक इसम बेकायादेशीरपणे देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश श्रीनिवास नारवा (वय-२६ वर्षे, रा. अमर दिप सोसायटी, कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय रमेश शिंदे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव (ता. शिरूर) येथील यश ईन चौक परिसरातील गोवा वाईन्स समोर एक इसम बेकायादेशीरपणे देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना एक इसम दारुची विक्री करताना मिळून आला.
दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या जवळील दारु साठा जप्त करून आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभिमान कोळेकर हे करत आहेत.