युनूस तांबोळी
शिरूर : पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेने साहित्यिक,
कथा,कादंबरी,एकांकिका,नाटक,चित्रपट कथा इ.विविधांगी लिहिणारे लेखक, कथाकथनकार, व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान आयोजीत केले होते.
मार्गदर्शन करताना कळमकर म्हणाले की, एका बारावीच्या विद्यार्थ्यांने फुल जिन्सची पॅन्ट बाजारातून विकत आणली होती.
त्याला ती थोडी मोठी झाली होती. त्याने कात्री अन सुई दोरा घेतला. घरात वडील पेपर वाचत होते. ताई मोबाईल मध्ये व्यस्थ होती. ताईला तो म्हणाला, मला उद्या बाहेर जायचय. ही पॅन्ट जरा मोठी झालीया, ती जरा मला कमी करून शिवून दे. असे म्हणून तो निघून गेला.
काही वेळाने बाबांचा पेपर वाचून झाला. ही मुलगी काय काम करणार नाही. म्हणून बाबांनी ती पॅन्ट कापली. शिवली अन तिथे ठेवली.
त्यानंतर ताईचा मोबाईल खेळून झाला. दादाने काम सांगितले काम केले नाही म्हणून रागवेल असे म्हणात तिनेही ती पॅन्ट कापली, शिवली अन तिथे ठेवली.
त्यानंतर आई बाहेरून घरात आली होती. त्यावेळी तिने पाहिले अन म्हणाली, ही पोर काहि कामाची नाहीत. पॅन्ट कमी करायला सांगितली तर ती केलीच नाही. मग तिने ही ती पॅन्ट कापली.शिवली तिथे ठेवली.
दुसऱ्या दिवशी तो उठला त्याने पाहिले पॅन्ट तिथ, कात्री तिथ, सुई दोरा तिथच म्हटल्यावर ‘आपनच हे काम करूयात, असे म्हणून
त्याने ती पॅन्ट पुन्हा कापली. अन शिवली. पण ही पॅन्ट तो पर्यंत बरमुडा झाली होती. असे म्हटल्यावर चांगलाच हशा सभास्थानी झाला.
त्यावर कळमकर म्हणाले की, सुसंवाद राहिला नसल्याने कुटूंबातील समाधान देखील बरमुड्यासारखे कमी कमी होत चालले आहे.