युनूस तांबोळी
शिरूर : वृक्ष वल्ली आम्ही सोयरीं वनचरे ! पक्षी ही सुस्वरें आळविती !!
येणे सुखे रूचे एकांताचा वास ! नाही गुण दोष अंगा येता !!
वृक्षतोड करून होळी साजरी करण्याऐवजी वृक्षारोपन करूण, त्यांची देखभाल करून साजरी करण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. पारंपारिक होळीचा सण साजरा करण्यासाठी पाच अथवा अकरा गोवऱ्या त्यात काडी कचरा टाकून होळी साजरी करावी. अर्पण करण्यात येणारा नैवेद्य होळीत न टाकता तो भुकेल्याची भूक मिटविण्यासाठी द्यावा. असे आवाहन पर्यवरण प्रेमी केले आहे.
दरम्यान, निसर्गात वृक्षांची खूप महत्वाची भूमिका असून पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी झाडे महत्वाची भूमीका बजावतात. आपण जर वृक्षारोपन केले, वृक्षाचे योग्य पालन पोषण केले तर त्यांच्या पासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. असे असले तरी होळीसाठी वृक्षतोड करण्याची कृप्रथा आजही कायम आहे. वृक्षतोड करून होळी करण्याऐवजी शहर परिसरात या निमित्ताने वृक्षारोपन करण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
होळी सण पारंपारिकेतेने साजरा करावयाचा असल्यास पाच अथवा अकरा गोवऱ्यांची छोटी होळी करावी. त्या प्रमाणे होळी साठी नैवेद्य दान केला जातो. यातून अन्नाची नासाडी होते. त्या ऐवजी नैवेद्य भुकेले आहेत, त्यांना द्यावा जेणेकरून त्यांची भूक मिटेल, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
होळी पारंपारिक सण साजरा करताना नागरिकांनी पर्यावरण पुरक होळी साजरी करावी. वृक्षतोड करण्याऐवजी वृक्षारोपन करावे. गोवऱ्यांची छोटी होळी करावी. जेणे करून पर्यावरण पुरक सण साजरा होईल.
सुनील जाधव,
पर्यावरण प्रेमी, पिंपरी पेंढार ता. जून्नर
वृक्षांपासून आपल्याला खुप फायदे आहेत. म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत. वनातील पशु पक्षी हे सुद्धा पांडूरंगाचे नामस्मरण करतात. आपले या वनाशी खर तर नातंच आहे. या वणांचे आवरण, मंडप म्हणजे आकाश आहे. तर ही धरा एक प्रकराचे अंथरूण आहे. कोणीही या आणि एकांतवास, सावली, वाऱ्याची झुळूक, पानाची सळसळ याचा मनसोक्त आनंद लुटा. अभंगातून संत तुकाराम महाराजांनी निसर्गाची महती विषद केली आहे. त्यामुळे पर्यावरण पुरक होळी करणे गरजेचे आहे.
पुंडलिक महाराज नागवडे, कीर्तनकार
होळी हा सण पारंपारिक असला तरी एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाण्याचा संदेश आहे. त्यासाठी निसर्गाची हानी न करता हा सण साजरा झाला पाहिजे. होळीत नारळ हवी दिले जातात. त्यात अनेक किलो खोबरे नष्ट होते. पर्यायाने सण साजरा होतो पण आपणच आपले नुकसान करतो.
सोपान वंडेकर, पर्यावरण प्रेमी, पिंपरी पेंढार जून्नर
सध्या प्रदुषणाने प्रत्येक ठिकाणी आजाराचे प्रमाण वाढले आहे. कचरा ही समस्या मोठी भयावह आहे. स्वच्छता मोहिमेसाठी वेगवेगळ्या योजना देशभरात राबविल्या जात आहे. होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रत्येकाने स्वच्छता करून कचरा गोळा करून होळी केली, तर पूर्ण देश स्वच्छ होईल.
– रामदास मिंढे, पर्यावरण प्रेमी पिंपरी पेंढार ता. जुन्नर