भोर: तालुक्याच्या पश्चिमेकडील रायरेश्वर किल्ला परिसरात दुपारच्या वेळी चरणाऱ्या बैलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेत बैलांच्या चलाखीमुळे एक बैल पळून गेला. तर दुसऱ्या बैलाला काहीशा प्रमाणात जखमा झाल्या.
रायरेश्वर किल्ल्यावर जंगल परिसर असल्याने वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांची अनेक जनावरे दगावली आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जनावरांची हानी होणार नाही, यासाठी रायरेश्वर किल्ल्यावरील शेतकऱ्यांच्या खासगी रानात पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे. तसेच बिबट्याच्या ‘हल्ल्यात दगावलेल्या जनावराची तत्काळ शासनाच्या माध्यमातून भरपाई करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.