पारगाव : वळती येथील शिंदे मळ्यात मेंढपाळाच्या शेळ्या – मेंढ्यांच्या वाड्यावर सलग दोन दिवस बिबट्याने हल्ला करून एक शेळी व मेंढीचा फडशा पाडला. शिंदे मळा, वळती परिसरात शेतकरी, मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना शनिवारी (ता.२४ ) व रविवारी (ता.२५) रात्री घडल्या आहे. शिंदे मळा, वळती परिसरात शेतकरी, मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वळती तेथे नरहरी श्रीपती शिंदे हे मेंढपाळ राहतात. त्यांच्याकडे शेळ्या- मेंढ्यांचा वाडा आहे. शनिवारी (दि. २४) रात्री बिबट्याने वाड्यात प्रवेश करून एका मेंढीला जागीच ठार केले. त्यानंतर दुसर्या दिवशी रविवारी (ता.२५ ) पुन्हा रात्री बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले.
त्यांचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सलग दोन रात्री शेळ्या- मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला झाल्याने मेंढपाळ नरहरी शिंदे हे भयभीत झाले आहेत.