पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. शरद मोहोळच्या हत्येच्या कटात दोन नामांकित वकीलांचा सहभाग होता. या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर चर्चा झाली होती. दोन्ही आरोपी वकिलांना हत्तेची माहिती असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणातील दोन आरोपी हे वकील आहेत. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी आरोपी वकिलांची नावे आहे. त्यापैकी एक वकील ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं आहे. ए
वढेच नव्हे तर त्या दोन्ही वकिलांना शरद मोहोळच्या खुनाच्या प्लानची संपूर्ण माहिती होती, असेही पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.