Land Records : लोणी काळभोर, (पुणे) : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीतील घटनेच्या निषेधार्थ पुणे विभागातील सर्व भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने असहकार व लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.
असहकार व लेखणी बंद आंदोलन
तासगाव कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे व शिपाई दत्तात्रय जगताप यांना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व इतरांनी मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून पुणे विभागातील सर्वच भुमि अभिलेख कर्मचा-यांनी असहकार पुकारुन कामबंद ठेवले आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती भुमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. Land Records
असहकार व लेखणी बंद आंदोलन पुकारल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली असून अनेकांची गैरसोय झाली आहे. अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांना निवेदन देऊन भुमि अभिलेखच्या कर्मचा-यांनी झालेल्या घटनेबाबत निषेध नोंदविला. Land Records
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सदानंद मोरडे विभागीय पदाधिकारी सुधिर पाटील, अजित लांडे, सोमनाथ कोरके पुणे जिल्हा पदाधिकारी प्रदिप भांगरे, अनंता जंगले, निलेश देशमुख, सागर पाटील, वैशाली जाधव, शरद सावंत व इतर कर्मचारी उपस्थित होते.