-बापू मुळीक
सासवड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींचा सन्मान सोहळा शुक्रवार (दि. 11 ऑक्टोंबर) सकाळी 11 वाजता सासवड येथील पालखी मैदानावर आयोजित केला आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
पुरंदर हवेली मतदारसंघात जवळपास एक लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे .भरपूर प्रमाणात महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले असून, ज्यांच्या तांत्रिक अडचण होत्या. त्यांनी ती दूर केल्या नंतर त्यांनाही तात्काळ या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा पहिलाच कार्यक्रम असून, यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत, असेही शिवतारे यांनी बोलताना सांगितले.