पुणे : पुण्यात कोणतेही अजब बॅनर लागले की लगेच चर्चा सुरु होते. मग ती कोणत्या नाटकासंबंधी असो वा इतर काही. चर्चा तर होतेच. पण आता असेच काहीसे बॅनर पुण्यात अनेक चौकांमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या 18,19,20 जानेवारीला पुण्यातील एक लाख मोबाईल ‘स्विच ऑफ’ होणार असे बॅनरवर लिहिले आहे.
सोशल मीडियावर या बॅनरचीच सध्या चर्चा सुरु आहे. हे बॅनर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात ‘18,19,20 जानेवारी सायंकाळी पुण्यातील किमान एक लाख मोबाईल स्विच ऑफ होतील’, असे लिहिण्यात आले आहे. मात्र, बॅनर कोणी आणि का लावले हे समजू शकले नाही. हे कुठं एका ठिकाणी नाहीतर पुण्यातील अनेक चौकांमध्ये सध्या असे बॅनर लावण्यात आले आहेत.
बॅनर फक्त ऍड कॅम्पेनसाठीच…
पुण्यामध्ये अशाप्रकारे अनेक चौकात बॅनर लागल्याने खरंच मोबाईल बंद पडणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात आता यामागचे कारण पुढे येत आहे. हे बॅनर एका ऍड कॅम्पेनसाठी लावण्यात आले आहेत. या कॅम्पियनमध्ये डॉ. विश्वास कुमार यांची ‘अपने अपने राम’ यांची कथा आहे. हे पोस्टर लावल्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. तर फक्त जाहिरातीच्या कॅम्पेनसाठीच असे बॅनर लावण्यात आले आहेत.