उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पल्लवी रमेश नाझीरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच अश्विनी चिंतामणी कड यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया कोरेगाव मुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (ता. 11) पार पडली.
ही निवडणूक प्रक्रिया सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत पल्लवी नाझीरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच जेधे यांनी उपसरपंचपदी पल्लवी नाझीरकर यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामविकास आधिकारी प्रल्हाद पवार यांनी निवडणूकीचे शासकीय कामकाज पाहिले.
यावेळी माजी सरपंच मंगेश अशोक कानकाटे, मनीषा कड, लीलावत बोधे, वैशाली सावंत, राधिका काकडे, बापूसो बोधे, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम भंडारे, रमेश नाझीरकर, चिंतामणी कड, संतोष काकडे, नितीन कड, प्रवीण शितोळे, गोरख कानकाटे, नंदकिशोर कड, संतोष गायकवाड, बाबासाहेब कोलते, चेतन कानकाटे, अप्पासाहेब कड, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच पल्लवी नाझीरकर म्हणल्या की, “गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी प्रयत्न करु. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे”, अशी अपेक्षा नाझीरकर यांनी यावेळी व्यक्त केली.