Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगावमूळ सरपंचांवरील अविश्वास ठराव प्रक्रिया अखेर वैध ! आता सरपंचपदाची निवडणूक होणार की ‘विलंबाचा सर्वोच्च ब्रेक’ लागणार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 December 2023, 20:01
Koregaon Mul sarpanch vithhal shitole plea rejected by bomby high court

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव उच्च न्यायालयाने कायम ठेवत शितोळे यांची याचिका फेटाळल्याने कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या राजकीय पटलावर नव्याने जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अविश्वास ठराव मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने त्या विरोधात सरपंच विठ्ठल शितोळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे परिसरातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरेगावमूळ ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी २१ फेब्रुवारी २०२३ रोजी १० विरुद्ध ३ अशा फरकाने अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावाविरुध्द सरपंच विठ्ठल शितोळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलात ४ ग्रामपंचायत सदस्यांनी जातपडताळणी प्रमाण पत्रक दाखल न केल्याने त्यांना अविश्वास ठरावात अपात्र करावे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करुन अविश्वास ठराव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.

या अपिलाची मागणी पुणे जिल्हाधिकारी यांनी २३ मार्च रोजी फेटाळून लावली होती. त्यानंतर सरपंच विठ्ठल शितोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल करीत उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकारी यांना सदस्य जातपडताळणी व अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आदेश दिले. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी यांनी १३ एप्रिल रोजी २०२३ अविश्वास ठरावावरील अपिल फेटाळत आपला निर्णय कायम ठेवला होता.

 

जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्णयावर सरपंच विठ्ठल शितोळे यांनी १७ जुलै २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली. या स्थगिती आदेशाविरोधात ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे यांनी स्थगिती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. त्यावर २ ऑगस्ट रोजी दिलेली स्थगिती उठवून ग्रामपंचायतिचा पदभार उपसरपंच यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दरम्यानच्या काळात कोरेगाव मुळ या ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच यांच्या अधिपत्याखाली सुरु होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एस. पटेल, कमल खाता यांनी १ डिसेंबर रोजीच्या सुणावणीत प्रशासनाने मंजूर केलेला अविश्वास ठराव वैध ठरविल्याने सरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची गेली ९ महिने सुरू असलेली अविश्वास ठरावावरील वैधतेची न्यायालयीन लढाईचा मुंबई उच्च न्यायालयात निर्णय झाला आहे. त्यामुळे आता विठ्ठल शितोळे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय शिल्लक असल्याने ते उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागून नवीन सरपंचपदाच्या नियुक्तीला “विलंबाचा सर्वोच्च ब्रेक” लावणार का याकडे हवेलीकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Two more died in talwade sparkle candle factory fire pune

पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या आठवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.