पुणे : पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa area) भागातील वाहतूकीत बदल करण्यात आला असून, गर्दी होणाऱ्या(Traffic Jams) वेगवेगळ्या रस्त्यांवर(different congested roads) हे बदल (changes) करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार एक महिन्यांसाठी म्हणजे, २४ मार्च ते २२ एप्रिलपर्यंत हा बदल प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
ज्योती हॉटेल चौकातून फकरी हिल्स चौक मार्गे कमेला, साळुंखे विहार येथे जाणारी वाहतूक उजवीकडे वळण्यास बंदी केली आहे. या वाहनांनी लुल्लानगर चौकातून यु-टर्न करून कमेला, साळुंखे विहार येथे वळविली आहे.
दरम्यान, ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शनमार्गे पारगेनगरकडे जाणारी जड वाहतूकीस बंद केली असून, या वाहनांनी सरळ ज्योती हॉटेल चौक, शितल चौक मार्गे पारगेनगरकडे जातील. तर, पारगेनगर येथून मेफेअर जंक्शन मार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी जड वाहतूक देखील बंदकरून पारगेनगर, शितल चौक मार्गे ज्योती हॉटेलकडे वळविली आहे.
Pune : रानडुकरांचा रिक्षावर हल्ला ; रिक्षा 300 फूट खोल दरीत कोसळून 1 जण ठार, तर 3 जण जखमी