Lok Sabha Election Result Live Updates :
- वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांची मोठी आघाडी
सुरुवातीला 6,300 मतांनी पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते. नंतर 436 मतांची आघाडी. आता पंतप्रधान मोदींनी थेट 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांच आव्हान आहे. -
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 5 हजार मतांनी आघाडीवर
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 29,472 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या राम सातपुते यांना 24,321 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे 5 हजार 151 मतांनी आघाडीवर आहेत.
- पहिल्या फेरीत अमोल कोल्हे सहा हजार मतांनी आघाडीवर
- बारामतीमध्ये उलटफेर, आता सुनेत्रा पवार आघाडीवर
- शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे आघाडीवर
- पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली, तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे. एकीकडे शरद पवार यांच्याविषयी सहानभूतीची लाट, तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकासकामांच्या उपकाराखाली दबलेला मतदार अशा द्विधा मनस्थितीतील बारामतीच्या मतदारांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न पडला होता. प्रचारात अजित पवारांबरोबर; पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणाच्या पारड्यात मते टाकायची, हाच यक्षप्रश्न पडला होता. दरम्यान, बारामतीत जनतेचा कौल कुणाला? हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे.