दौंड : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावातील अहिल्यादेवी विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची १६ ऑगस्ट रोजी निवडणूक पार पडली. माजी चेअरमन मोहन टूले यांनी इतर संचालकांना संधी मिळावी म्हणून चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाल्याने निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुक प्रक्रियेवेळी किसन ज्ञानदेव महानवर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून एस.एम. गव्हाणे व सोसायटीचे सचिव – राहुल डूबे यांनी काम पाहिले.
किसन महानवर यांची निवड होताच उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक मोहनकाका टुले, माजी चेअरमन मोहन टुले, संचालक सुदाम टकले, माजी उपसरपंच जगदीश महानवर, व्हा.चेअरमन सुनील अडागळे, दशरथ थोरात, रामचंद्र टुले, मोहन आ. टुले, संचालिका नीलम टुले, सुंदराबाई टकले, शिपाई निलेश टुले यांसह सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व्हा.चेअरमन, व संचालक मंडळ उपस्थित होते.