Khed Crime News | पुणे : खेड पंचायत समितीत बांधकाम शाखा अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा वनविभागाच्या जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण असावे, अशी चर्चा रंगली होती.
कनिष्ठ अभियंता बापुसाहेब शेषराव शिंदे यांचा हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे अहवालाच नमूद करण्यात आले आहे. शिंदे वाकळवाडी सभामंडप प्रकरणामुळे प्रचंड तणावाखाली होते. असे बोलले जात आहे.
रस्त्याच्या कडेला आढळला होता मृतदेह….
शिंदे मृतावस्थेत ज्या ठिकाणी आढळुन आले, तेथे त्यांच्या जाण्याचे कारण, ते स्वतः गेले, त्यांना निमंत्रित केले की आणखी काही या बाबी गुलदस्त्यात आहेत. पोलीस चौकशीतून योग्य माहिती समोरच येईलच. मात्र खेडच्या राजकीय कुरघोडीचा हा शासकीय बळी आहे का? अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.
अभियंता शिंदे सोमवारी घरातुन गेल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. शोध सुरू असताना मंगळवारी (दि. १४) संध्याकाळी बुट्टेवाडी (ता. खेड) परिसरातील वनविभागात झोपलेल्या अवस्थेत त्यांचे शव मिळुन आले. पोलिसांनी संशयास्पद मृत्यु झाला असल्याची नोंद केली होती. चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले. असे असले तरी वाळकवाडी सभामंडप काम न करता दीड वर्ष अगोदर बिल दिलेले प्रकरण यापाठीमागे असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरु आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोन्ही बाजुच्या मागणीनुसार व प्रक्रिया म्हणून अभियंता शिंदे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांना मोबाईलवर बोलून आणलेला दबाव याची निष्पक्षपाती चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Khed Crime News | खेड पंचायत समितीतील बांधकाम शाखेच्या अभियंत्याचा रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
Khed Crime : चोरट्यांनी केले मंदिरांना लक्ष्य! दावडीतील दोन मंदिरात चोरी, १ लाखाचा ऐवज लंपास