युनूस तांबोळी
शिरूर Shirur : रंगीबेरंगी काठी अन त्यासमोर सनईच्या सुरावर वाद्य कलाकारांची चढाओढ, फुलानी सजविलेल्या पालखी सोहळा, मंदिरावर असणारी विद्युत रोषणाई यातून भंडारा अन खोबऱ्याची तळी भरत यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणा देत जांबूत ( ता. शिरूर ) (Shirur) येथे अक्षय तृतीया निमित्त ग्रामदैवत खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. (Shirur) बैलगाडाशर्यत, कुस्तिचा आखाडा अन लोकनाट्य तमाशाच्या मनोरंजनाने या यात्रेला आगळे वेगळे स्वरूप आले होते. (Shirur)
सकाळी देवाला अभीषेक, काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी खंडोबाच्या दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रा कमेटीने बैलगाडा घाटाचे नियोजन केले होते. यासाठी बैलगाडा शर्यतीला परिसरातील गाडा मालक, शौकीन व ग्रामस्थांनी हजेरी लावल्याने बैलगाडा घाटात गर्दी पहावयास मिळाली. यावेळी माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उदघाटन झाले. बैलगाडा शर्यती दरम्यान दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, सतिष पाचंगे, सावित्रा थोरात, प्रभाकर गावडे, डॅा. सुभाष पोकळे, जयश्री पलांडे, पोपटराव गावडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, सरपंच दत्ता जोरी, उपसरंपच राणि बोर्हाडे, बाळकृष्ण कड, बाळासाहेब पठारे, बाळासाहेब बदर, बाळासाहेब फिरोदिया, नाथा जोरी, अरूण कदम, योगेष जोरी, दिनेश थोरात, दिनेश गाजरे, गोरक्ष गाजरे, राहुल जगताप, सिताराम म्हस्के, पोपट फिरोदिया, डॅा. खंडू फलके, बाळासाहेब भाऊ पठारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीमध्ये स्व. सचिन आप्पा भंडलकर ( राजगूरूनगर ) यांचा बैलगाडा घाटाचा राजा ठरला. फळीफोड होण्याचा बहूमान कृष्णा मेरगळ ( जांबूत ) यांना मिळाला. फायनलसाठी मयुर डुकरे ( पारगाव ), संगिता रोडे ( लाखणगाव ), स्व. सचिन भंडलकर ( राजगुरूनगर ), कृष्णा मेरगळ ( जांबुत ), शिवाजी जोरी ( जांबूत )कचर पानमंद ( चांडोह ), दिपक गाजरे ( जांबूत ) हे फायनलचे मानकरी ठरले.
बैलगाडा मालकांना २ लाख ३० हजार रूपये इनाम वाटप करण्यात आले. समालोचक म्हणून शिवाजीराव चव्हाण, संभाजी निचीत, सुनील डुकरे यांनी काम पाहिले. आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, धनंजय थेऊरकर, विशाल पालवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, रवीवार ( ता. २३ ) सकाळी हजेरीचा कार्यक्रम झाला. दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. यासाठी ३० हजारांचे बक्षीस वाटण्यात आले