सासवड : भिवरी (ता.पुरंदर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी केरबा शंकर शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी व्हाईस चेअरमन सुनील रामदास गोफणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी ही निवड करण्यात आली. भिवरी ग्रामपंचायती प्रमाणेच विकास सोसायटी चेअरमन निवड सलग 20 वर्ष बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे.
भिवरी (ता.पुरंदर ) येथील श्री भैरवनाथ मंदिरात पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके व भिवरीकर ग्रामस्थ यांच्या हस्ते व्हाईस चेअरमन केरबा शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भिवरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाचे चेअरमन भाऊसाहेब दळवी, संचालक धोंडीबा कटके, सुनील गोफणे, रामदास कटके, नवनाथ कटके, अशोक जगदाळे, म्हस्कु कटके, किरण कटके, यशवंत वाडकर , नंदा येवले, केशव घाटे, वंदना चौधरी उपस्थित होते.
सदर निवडप्रसंगी भैरवनाथ मंदिरात दिलीप कटके, शेखर कटके, अनिल गायकवाड, संतोष घिसरे, मनोज घिसरे, सचिव अमोल फडतरे आदींसह विविध संस्था, संघटना, पक्ष, मंडळे यांच्या पदाधिकाऱ्यांसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शी कारभार करुन शेतकरी सभासदांना चांगली सेवा देणार असल्याचे निवडीनंतर नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन शंकर शेलार यांनी सांगितले.