गणेश सुळ
Kedgaon News : केडगाव : पाऊस हा माणसाबरोबरच चराचर सृष्टीला त्याच्या येण्याची आर्त ओढ असते. बळीराजा त्याची चातकासारखी वाट पाहतो. पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझे लई तहानलेले चातकवणी निढलावर मी हात ठेऊनी वाट किती पाहू. (Fall water, water water water, my fields are thirsty)
बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत
उन्हाळा शिगेला पोहचलेला असतो तेव्हा वावटळी उठतात. (Kedgaon News) पालापाचोळा घोळक्याने जमा होत उंच आकाशाकडे झेपावतो आणि तसेच गोल भवऱ्यागत घुटमळत पुढे पुढे निघून जातो. २५ मेला रोहिणी नक्षत्र चालू झाले आहे.
रोहिणी नक्षत्र म्हंटले की शेतीच्या कामाला उत्साह येतो. रोपाची तयारी, नांगरणी वगैरे कामे करून मशागत केली जाते. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसतो. हे नक्षत्र सुरू होते तेव्हा पाऊस पडणे अपेक्षित असते. ((Kedgaon News) या नक्षत्रात येणारा पाऊस म्हणजे धसमुसळेपणा. लक्ख विजाचे झोत, कधी आकाशावर अग्निरेषा उमटतात . ढगाचे ढोल बडवित प्रचंड गडगडाट करत पाऊस येतो.
सध्याच्या लक्ख अशा उन्हात पावसाच्या आतुरतेने बळीराजा चिंतेत बुडतो आहे. त्याला घाम फुटायला लागला आहे की पाऊस कधी होणार. काळे मेघ दाटून ओढे नाले भरून कधी वाहणार?
जसे की
धोंडी धोंडी पाऊस दे
धोंडी गेली धुऱ्याने
पाऊस आला जोऱ्याने…….
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस पाडे मोठा
साल आहे सोके
पाचखणी मेंडके
धोंडी गेली रागाने
तिला धरले वाघाने
पूर्वी काळी असे म्हटले जायचे. जेव्हा पाऊस बरसू लागेल तेव्हा पेरणीच्या कामाला जोर येईल. काळया लाल तापलेल्या भुईत बीज पेरले जाईल. पावसात बळीराजा निसर्गाच्या संवेदनेने पुन्हा जिवंत होतो. (Kedgaon News) त्याच्यातील जैविक प्रेरणा जाग्या होतात.
दरम्यान, बळीराजा बरोबरच इतरही पशुपक्ष्यांचा आनंदी किलबिलाट डोंगर- जंगलात, राना – वनात भरून जातो. माणूस आणि इतर जीवाचा सुसंवाद पावसात दिसतो आहे. (Kedgaon News) सर्वांना पावसाची आतुरता लागली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक
Yavat News : कचरामुक्त गाव अभियान अंतर्गत यवत येथे श्रमदान, घनकचरा प्रकल्पासाठी जागेची पाहणी