गणेश सुळ
Kedgaon News केडगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सध्याच्या राजकीय उलथापालथीच्या वातावरणाविरोधात संपूर्ण राज्यामध्ये ‘एक सही संतापाची’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. (Kedgaon News) त्याच धर्तीवर दौंड शहरातही पक्षाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘एक सही संतापाची’ कार्यक्रम राबविण्यात आला. (Kedgaon News)
सध्या राज्यातील राजकारणाचा जो चिखल झाला आहे, या न पाहविणाऱ्या परिस्थिती विरोधात सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट आहे, असे दिसत आहे. त्यामुळे सामान्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता याव्यात म्हणून पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे मनसेचे पदाधिकारी सचिन कुलथे यांनी यावेळी सांगितले.
पक्षाचे पदाधिकारी संदीप बोराडे, मंगेश साठे, नंदकिशोर मंत्री, लता बगाडे, अभिजीत गुधाटे, अक्षय साठे तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पळसे व अजय कटारे उपस्थित होते.
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. तशी त्याची आवश्यकताही आहे. ठाकरे बंधू आता तरी एकत्र या असा मजकूर लिहून काही शिवसैनिकांनी सह्या केल्या.
– सचिन कुलथे, मनसे पदाधिकारी.