युनूस तांबोळी (शिरूर-पुणे)
सार विसरुन जातो
असतो जेव्हा निसर्गात.
पण पानगळ पाहतो ना
मग उजाड झालेले मन म्हणत.
हा तर नियम निसर्गाचा
एके दिवशी वसंत येईल
पुन्हा नवी पालवी घेऊन
परत येईल तोच उल्हास
तिच असेल नवी सकाळ.
पण यामागे चक्र निसर्गाचे
मग काय करू मी. जीवन माझे गुंतागुंतीचे…! जीवन माझ खुप गुंतागुंतीचे…!
नवी पालवी विसरून जाईल
जुन्या पानगळतीला
कोवळी पाने पुन्हा सोसतील
वारा, ऊन, थंडी, पावसाला
तारूण्यात हासतील बागडतील
जेष्टात हिरमुसल्याने
संधी गेल्याने रडतीलही
एके दिवशी पिकतील सुकलेल्या पाना प्रमाणे
नाहिसे होतील जीवनातून
मग काय करू मी. जीवन माझे गुंतागुंतीचे…! जीवन माझ खुप गुंतागुंतीचे…!
मेसेज डिलीट होऊ शकेल
माझी मैञी नाही.
जीवनाला सारख रिफरेस करतोय
पण पुन्हा व्हायरस येतोय.
मग काय करु.
एक झाल का दुसरा
हो नाहि म्हटल तरी
परत परत मागे लागलेलेच
काय करु जीवनाला डिलीट कराव वाटतेय.
मग काय करू मी. जीवन माझे गुंतागुंतीचे….! जीवन माझ खुप गुंतागुंतीचे…!