पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख करत त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गणेश भोकरे व्हिडिओत काय म्हणाले?
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेनंतर विरोधकांच्या पायाच्या खालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या देण्यात येत आहेत. कसली भाषा करत आहेत, हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. माझ्या सहकाऱ्यांना धमक्या द्यायच्या आधी या गणेश भोकरेला भिडा मी एकटा नाही. माझ्या मागे सर्व मित्र परिवार आहे आणि गोरगरीब जनता आहे, जे काही करायचं आहे ते समोर येऊन करा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी यायला मी तयार आहे, असे गणेश भोकरे यांनी व्हिडिओ म्हटलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
हिशोबात रहा, निवडणूक झाल्यावर बघून घेईन…
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात बिनसल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कसली भाषा करत आहेत हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याच गणेश भोकरे म्हणाले. मला जर अजून धमक्या आल्या तर मी थेट रासने यांच्या ऑफिसवर धडकणार असल्याचा इशाराही गणेश भोकरे यांनी दिला आहे.