Kartavya Foundation : यवत / राहुलकुमार अवचट : भांडगाव येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने भांडगाव परिसरातील सुशिक्षित, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्याम कापरे यांच्या संकल्पनेतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते मोफत १२ संगणक वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भांडगावचे सरपंच लक्ष्मण काटकर, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीकांत जगताप हे होते.
राजकारण करताना सामाजिक जबाबदारी जपणे हे आपले कर्तव्य असून, श्याम कापरे यांनी आपल्या कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हाती घेतला. हा आदर्श नेहमीच सर्वसामान्य व समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी समाज उपयोगी असेल. तरुण पिढीला शिक्षण घेत असताना त्यांना सुविधा पुरवणे ही सर्वांची जबाबदारी असून, सामाजिक बांधिलकीतुन कर्तव्य फाउंडेशन वारसा पुढे घेऊन जात आहे. समाजहिताच्या कामासाठी मी कायमच पाठीशी असेल असे मत आमदार राहुल कुल व्यक्त करत संस्थेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक श्याम कापरे हे मागील १५ वर्षापासून भांडगाव परिसरामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असून, कोविड काळात गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप, गावातील १०-१२ वीच्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहनपर बक्षीस, आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनात कोविड रुग्ण, अपघातग्रस्त रुग्ण आणि विविध शस्त्रक्रिया मोफत करण्याकामी रुग्णांना मदत, गावतील शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात असे अनेक उपक्रम आजपर्यंत राबविण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन हैदर शेख, दत्तात्रय हरपळे, गणेश सकट, रवींद्र जाधव, सोमनाथ हरपळे आणि सुभाष जाधव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलम दोरगे, नंदा जाधव, सदाशिव दोरगे, विजय दोरगे, प्रमोद दोरगे, सदाशिव गायकवाड,शंकर हरपळे, रवींद्र दोरगे, महेंद्र दोरगे, राहुल बोरकर, संतोष दोरगे, दत्तात्रय दोरगे, राहुल खळदकर, प्रदीप दोरगे यांसह महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास दोरगे यांनी केले तर श्याम कापरे यांनी आभार व्यक्त केले.
शक्य ती मदत करणे हे माझे कर्तव्य
“मी एका गरीब कुटुंबातून शिकून पुढे आलेलो आहे, त्यामुळे माझ्या ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि होतकरू तरुण शहरी मुलांच्या आणि तंत्रज्ञानाचा युगात पुढे गेली पाहिजेत आणि त्यांना माझ्या परीने शक्य ती मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी हे छोटेसे पाऊल आज दिवाळीच्या मुहूर्तावर टाकले आहे”.
– श्याम यशवंत कापरे,
संस्थापक, कर्तव्य फाउंडेशन