केडगाव : दौंड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची मिळून कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु होती. त्यानुसार, अधिकचे अर्ज देखील आले होते. मात्र, अतिरिक्त अर्ज मागे घेण्यात आल्याने ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
कर्मयोगी सुभाषआण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची दरवर्षीची उलाढाल ही जवळपास 80 कोटींच्या आसपास असून, या संस्थेमार्फत अनेक शिक्षकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळते. या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु होती. यामध्ये अर्ज मागे घेण्याची 23 जानेवारी ही शेवटची तारीख असल्यामुळे या दिवशी निवडणूक लागणार की बिनविरोध होणार हे ठरणार होते. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यामध्ये दौंड तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रयत्नांना यश आले व पतसंस्थेवर 17 संचालक बिनविरोध निवडून दिले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्य प्राथमिक संघाचे सरचिटणीस अप्पासाहेब कुल, पुणे जिल्हा प्राथमिक संघाचे उपाध्यक्ष विकास शेलार, रामभाऊ दोरगे, गौतम कांबळे, बापूराव खळदकर, संदीप थोरात, महादेव बंडगर, महेश दरेकर, उमेश देशमुख, राजेंद्र जगताप यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :
१) देवकर राजू आनंदराव
२) थोरात बाळासाहेब त्रिंबक,
३) खेडेकर दादासाहेब नानासाहेब
४) मांढरे शशिकिरण नारायण
५) खळदकर बापूराव चंद्रकांत
६) चौधरी मारुती गोविंद
७) चिरके प्रशांत नाना
८) जगताप राजेंद्र गुलाब
९) धुमाळ शरद सुरेश
१०) कोल्हे किरण दिलीप
११) जगताप शांताराम सूर्यकांत
१२) बंडगर महादेव श्रीमंत
१३) कांबळे गौतम काशिनाथ
१४) जगताप पल्लवी सुनील
१५) दरेकर सुषमा महेश
१६) भुजबळ शंकर रामचंद्र
१७) थोरात संदीप सुरेश