Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karad Accident News: आंबेनाली घाटात भीषण अपघात; वॅगनआर कार 300 ते 400 फूट दरीत कोसळली, पाच जखमी

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 13 March 2026, 12:58

Karad Accident News : कराड : सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर यांना जोडणाऱ्या आंबेनाली घाटात गुरुवारी पहाटे भीषण अपघात (Accident) घडला. मुंबईहून परतत असलेली वॅगनआर कार बावली टोक आणि चिरेखिंड परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बचाव करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील लखवड गावातील संकपाल कुटुंब मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास आंबेनाली घाटातील बावली टोक आणि चिरेखिंड दरम्यान कारवरील नियंत्रण चालकाकडून सुटले. कार प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा रेलिंगला धडकली आणि त्यानंतर थेट खोल दरीत कोसळली. हा भाग अतिशय धोकादायक असल्याने अपघातानंतर परिसरात मोठी घबराट पसरली.

कार दरीत कोसळल्यानंतर वाहनातील प्रवाशांनी मदतीसाठी आवाज दिला. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी स्थानिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिक, प्रतापगड शोध आणि बचाव पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बचाव पथकाने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून दोरीच्या मदतीने खोल दरीत उतरून जखमींपर्यंत पोहोचले. दरीचा भूभाग कठीण असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. सर्वात गंभीर जखमी व्यक्तीला प्रथम स्ट्रेचरच्या मदतीने वर आणण्यात आले. त्यानंतर इतर जखमींनाही काळजीपूर्वक वर काढून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.

 

या अपघातात अजय सुनील संकपाल, तुकाराम संकपाल, सुनील संकपाल, पार्थ संकपाल आणि संगीता संकपाल हे जखमी झाले आहेत. सर्वजण महाबळेश्वर तालुक्यातील लखवड येथील रहिवासी आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अत्यंत धोकादायक परिस्थितीत दरीत उतरून बचाव कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ….

Saturday, 19 September 2026, 16:37

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06
Next Post

Pune News: भक्तीच्या नावाखाली चाललंय काय? आळंदीतील 'त्या' शिक्षण संस्थेतील भयाण वास्तव समोर; मुलाच्या अंगावरील वळ पाहून पोलीसही चक्रावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp